बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खोटं ओळखपत्र बनवून लसीकरण केल्यासंदर्भात वादात सापडलेल्या अभिनेत्रीने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

ठाणे | बनावट ओळखपत्र बनवून लस घेतल्यासंदर्भात वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री मीरा चोपडा हिने आता तिच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. 2 दिवसांपासून मीरा चोपडा हीच्या नावाने ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयातील सुपरव्हायझर पदाचं, तिचा फोटो असलेलं ओळखपत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

दरम्यान, ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोरोना सेंटरमध्ये काम करत असल्याचं खोटं भासवून मीराने लस घेतली आहे. असा आरोप सध्या केला जात आहे. या प्रकरणात मिराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लस घेतल्याचा फोटो आणि हे ओळखपत्र पोस्ट केलं होतं. पण त्यानंतर वाद उफाळून आल्याने मिराने ते फोटो अकाऊंटवरून डिलीट केले.

यासंबंधी, अभिनेत्री मीरा चोपडा हिने आता स्पष्टीकरण दिलं आहे. “सोशल मीडियावर फिरणारं ओळखपत्र हे माझं नाही. मी लसीकरण पूर्ण केलं हे सत्य आहे पण त्यासाठी मी एक महिना सतत प्रयत्न केले व त्यासाठी लागणारं आधार कार्ड संबंधित विभागाला दिलं होतं. अशा प्रकारचं बनावट ओळखपत्र मी पहिल्यांदाच ट्विटरवर पाहिलं, याबद्दल मला काहीही माहिती नाही. शिवाय मला सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे की, अशा प्रकारचं खोटं ओळखपत्र कोणी कसं आणि का बनवलं”, अशा प्रकारचं ट्विट करत मीरा चोपडा हीने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या प्रकरणात आता ठाणे महापालिकेचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मागणीला महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवे यांनी योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले आहे. मीरा चोपडा या अभिनेत्रीने तामिळ व तेलुगू सिनेमांमध्ये मोठ्याप्रमाणात काम केलं आहे तसेच काही हिंदी चित्रपटांमध्येही ती दिसून आली. याबरोबरच ‘द टॅटू मर्डर्स’ या हॉटस्टारवरील वेबसिरीजमध्येही तिने काम केलं आहे. याशिवाय मीरा चोपडा ही अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि परिणीती चोपडा यांची चुलत बहीण आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन उशिराने होणार; हवामानतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

शनिवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढली; इंजेक्शनचा साठा अपुरा

पद्मावतनंतर आता अक्षय कुमारचा ‘हा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेनं दिली खुली धमकी

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More