Top News महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द

मुंबई | एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा जीआर राज्य सरकारने काढला होता. सरकारच्या या जीआरला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत होता. याच पार्श्वभमूीवर अखेर तो जीआर रद्द करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर काढणार आहे.

दरम्यान, पोलीस भरतीत एसईबीसी अतंर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस अतंर्गत भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

मराठा संघटना या जीआरला मोठया प्रमाणात विरोध केला होता. त्यानंतर गृह विभागाने हा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता  पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे”

“मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा करणार क्रॉस”

“मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव”

‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीला डिस्चार्ज; दादा म्हणाला….

…त्यामुळेच सोनू सूदवर कारवाई करण्यात आली- राम कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या