बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही दिवसा स्त्रीची पुजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो”

नवी दिल्ली | कंगणाच्या वादग्रस्त विधानानंतर कंगणाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता कंगणानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास याने अमेरीकेतील एका शोमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वीर दासने अमेरिकेतल्या शोमध्ये “मी अशा भारतात राहतो. जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पुजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो,” असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर वीर दासवर देशभरातून टीका होत आहे.” अॅड आशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांकडे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

वीर दासने अमेरिकेत टु-इंडीया नावाचा एकपात्री प्रयोग सादर केला होता. त्यामध्ये त्याने भारताविषयी, पंतप्रधान मोदींविषयी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. याप्रकरणी आशुतोष दुबे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आशुतोष दुबे हे भाजपचे कायदा सल्लागार आहेत.

दरम्यान, वीर दासने त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंटनंतर खुलासा केला होता. त्याने ट्विट करून “मी यु-ट्युबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारताच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवल्या आहेत. त्यामध्ये अपमान करण्याचा हेतू नसून आपण सगळेच भारत देशावर प्रेम करतो. त्यामुळे कोणत्याही एडीट केलेल्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नका,” असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान मोदींनीही गुंतवणूक केलेली पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना आहे तरी काय?

राष्ट्रवादीची पदाधिकारी निघाली चक्क चोर, आतापर्यंत चोरल्या 19 गाड्या

समीर वानखेडे अचानक मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला, चर्चांना उधाण

भागवत कराडांच्या ‘कर्तव्यदक्षतेच्या प्रवासाचं’ पंतप्रधानांनीही केलं कौतुक

“गांधीजीची इच्छा होती की भगत सिंग यांना फाशी मिळावी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More