जम्मू | जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा लोकांना ऐकवला.
जेव्हापासून कोरोना महामारी आली आहे तेव्हापासून पत्नीचं चुंबनही घेतलं नाही, असं फारूक अब्दुला म्हणाले. यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.
कोणीही हात मिळवणे अथवा मिठी मारण्यापासून घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं फारूक अब्दुला यांनी म्हटलंय.
दरम्यान, फारूक अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर याआधीही अशाप्रकारे वक्तव्य केली आहेत. ते नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती- नारायण राणे
‘या’ गावात रामदास आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड!
कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत
भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी