बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

मुंबई | राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांचा वाढदिवस झाला अन् त्यानंतर विधानपरिषदेचा (MLC Elections) निकाला जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आमदार अमोल मिटकरी (MLC Amol Mitkari) यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या आक्रमक भाषणांसाठी राज्याच्या राजकारणात सर्वपरिचीत आहेत. सोलापूरच्या एका सभेत बोलताना त्यांचा तोल ढासळल्याचं पहायला मिळालं आहे. शरद पवार हे मृत्यूंजय आहेत ते अनेकांच्या अत्यंयात्रेला जातात. येत्या काही दिवसांमध्ये गुजरातला सुद्धा जाऊन येतील, असं वादग्रस्त वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

शरद पवार यांची स्तुती करण्याच्या नादात अमोल मिटकरी यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सध्या मिटकरींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार हे स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम आहेत. सर्वजण त्यांच्या तब्येतीची काळजी करू नका, असंही मिटकरी म्हणले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीबाबत अनेकदा विविध राजकीय पक्षातील नेते चिंता व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण आता अमोल मिटकरी यांच्या अशाप्रकारच्या टीकेनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

सनी लिओनी म्हणते,”हा प्रसिद्ध चित्रकार कोण?”; अनिल कपूरनं दिलं भन्नाट उत्तर

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

भारतीय सैन्याला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा खात्मा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महागाईने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली

दिल्लीत नेमकं शिजतंय काय? शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More