बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप आमदार उषा ठाकूर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत, असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

भगवीकरण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे. मुलांना संस्कार देण्यासाठी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य देण्यासाठी, आध्यात्मिक शिक्षण आणि नियमित पूजा-हवन केलंच पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

ऐतिहासिक पुरावे हे सिद्ध करतात की खरंतर सर्व पूर्वज हिंदूच होते. जर तुम्ही गेल्या चार-पाच पिढ्यांचा अभ्यास केलात तर तुम्हाला स्वतःलाच हे लक्षात येईल, असंही उषा ठाकूर म्हणाल्यात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उषा ठाकूर यांनी अनोखी शक्कल लढवली होती. माझ्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर 100 रुपये द्या असं म्हटलं होतं. अनेकदा सेल्फीमुळे त्यांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळेच ज्याला आपल्यासोबत सेल्फी काढायचा असेल त्याला अगोदर पक्षासाठी 100 रुपयांचा निधी जमा करावा लागेल, अशी घोषणा ठाकूर यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही?”

“रोज बारामतीला नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात”

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही”

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक; अरुणा भाटियांचं उपचारादरम्यान निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More