”लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने 5 ते 6 मुलांना जन्म द्यावा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारताची लोकसंख्या नियत्रंणात आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपुर प्रयत्न करत आहे. राज्य सरकारदेखील अनेक नवनवीन योजना आणत असतं. मात्र हल्ली अनेक संत महाराज नवनवीन वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आता पुन्हा एकदा देवकीनंदन महाराजांनी एक वक्तव्य केलं आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने 5 ते 6 मुलांना जन्म द्यावा असं वक्तव्य देवकीनंदन महाराजांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये श्रीकृष्ण कथा सांगण्यासाठी आले होते. प्रत्येक सनातनी कुटुबानं 5-6 मुलांना जन्म द्यावा. यासाठी मुला-मुलीनीं वेळेवर लग्न करणं गरजेचं आहे. असंही ते पुढे म्हणाले.

25 वर्षात आपला देश सनातनी धर्म मानणारा आणि हिंदू धर्म मानणारा झाला नाही तर आपल्या देशाचं काय होईल हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपला देश 25 वर्षांनी सेक्युलर राहिल का? असा सवाल त्यांनी केला आहे. जेव्हा यामागचं वास्तव तुम्हाला समजेल तेव्हाच मी काय म्हणत आहे हे तुम्हाला कळेल,असंही ते पुढं म्हणाले.

9 राज्यांमध्ये आपण अल्पसंख्य आहोत. सरकार कोणत्याही विचारांचं असो आपल्या अधिकारांची मागणी आपण सरकारकडं केलीच पाहिजे. यावेळी देवकीनंदन महाराजांनी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. सनातन संस्कृती पाळणाऱ्यांपर्यंत सनातन परंपरा केली पाहिजे यासाठी बोर्ड हवं,असं वक्तव्य देवकीनंदन यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या