बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लीम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात… रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

सोलापूर | मुस्लीम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका असतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढ अधिक आहे. 100 कोटीवरून ती आता 150 कोटींपर्यंत गेली आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर कुटुंब नियोजनचा कायदा करण्याची आवश्‍यकता आहे, असं आठवले म्हणाले.

जागतिक लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षात तो अधिक वाढला आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर एक कुटुंब, एक मुल असा कुटुंब नियोजनाचा नवा कायदा करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

देशाच्या हितासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक आहे. मुस्लिम समाजाने या कायद्याविषयी उगाच बाऊ करण्याची गरज नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात हा कायदा नाही. समान नागरी कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पुरुष पळाले पण देशासाठी एकच महिला लढत होती, अखेर सलीमाला तालिबान्यांकडून अटक

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना दिला ‘हा’ इशारा

बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं दिलं आणखी एक मोठं गिफ्ट!

राज्यात सर्वदूर पाऊस?, हवामान खात्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारा

अफगानिस्तानच्या पळपुट्या राष्ट्रपतींचा छडा लागला, कुटुंबासह लपलेत इथं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More