नागपुरात मोठ्या घडामोडींना वेग, प्रशांत कोटकरांना कोणत्याही क्षणी अटक होणार

Prashant Koratkar

Prashant Koratkar | इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नागपुरातही या प्रकरणी हालचालींना वेग आला आहे. प्रशांत कोरटकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात कोरटकरांवरील कारवाईसाठी हालचाली

इंद्रजित सावंत यांना ब्राह्मण समाजाविषयी प्रश्न विचारण्याच्या नावाखाली कोरटकर यांनी फोन केला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर ही संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली. मंगळवारी इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पुरावे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी कोरटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत कोरटकरांना ताब्यात घेण्यासाठी नागपूरकडे पथक रवाना केले आहे. या पथकात उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत. कोरटकर यांना नागपूरमधील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी कोल्हापूर येथे नेण्यात येण्याची शक्यता आहे.

कोरटकरांच्या घराबाहेर आंदोलन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) यांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने एकत्र येऊन घोषणाबाजी केली. त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन कोरटकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कोरटकरांच्या घरासमोर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

याचवेळी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरटकर यांनी स्पष्टीकरण देत आपला आवाज AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरण्यात आल्याचा दावा केला. आपण कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नसल्याचे सांगत त्यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

Title : Controversial Statement on Shivaji Maharaj Prashant Koratkar in trouble

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .