बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीत ठिणगी?, भुजबळ तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

मुंबई | काही दिवसांपुर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढवण्याच्या चर्चा चालू होत्या. अहमदनगर महापालिकेत दोन्ही पक्षाने एकमेकांना टाळी सुद्धा दिली आहे. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये बिनसलं असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे दोन राष्ट्रवादीचे मंत्री ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या 100 खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. पण शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

दुसरीकडे ओबीसी राजकीय आरक्षण तिढा कायम असताना राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कोविड काळात निवडणुका थांबवण्यात याव्यात, अशी भूमिका मंत्रिमंडळात मांडणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीत नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे थेट शरद पवार यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गैर नाही. कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत, असं नाना पटोले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

काँग्रेस स्वबळावरच लढणार, शब्द दिलाय, आता माघार नाही- नाना पटोले

डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचं प्रमाण अधिक, तरी घाबरू नका- राजेश टोपे

“गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरले, आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची चीनला जाणीव”

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More