ऑफलाईन परीक्षेवरून वाद पेटला, वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
मुंबई | शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? या मुद्द्यावरुन दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आज मुंबईत विविध भागात आंदोलनास सुरूवात केली. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.
परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळापत्रकानुसारच घेण्यात येतील असल्याचं कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. यानंतर मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले आणि त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. आता हे आंदोलन चिघळत चालल्याचं दिसत आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसून परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. सध्या या आंदोलनाचे पडसाद हळूहळू राज्यभर उमटू लागले आहेत. ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे. असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई के धारावी में 10वीं और 12वीं की परीक्षा ऑनलाइन कराने की मांग को लेकर छात्रों का उग्र आंदोलन, @news24tvchannel #onlineexams #StudentProtest#Mumbai pic.twitter.com/vKQ76MCdOe
— Indrajeet Singh (@iamindrajeet74) January 31, 2022
थोडक्यात बातम्या –
वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल
राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे नाराज, म्हणाले…
“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”
“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”
हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….
Comments are closed.