बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगी सरकारचा रंगारंग कार्यक्रम! मोदींच्या दौऱ्याआधी एका रात्रीत मस्जिदीचा रंग बदलला

लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या विविध राज्यांमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी जात आहेत. नरेंद्र मोदी हे आरएसएसचे (RSS) प्रचारक सुद्धा राहिले आहेत. देव आणि धर्माबद्दल जागरूक व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. अशातच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मोदींच्या दौऱ्यापूर्वी एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

आगामी काळात उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी भाजपसमोर सत्ता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. परिणामी सध्या भाजप सरकारनं विकासकामांचा सपाटा लावला आहे. नरेंद्र मोदी हे 13 डिसेंबर रोजी वाराणसी (varanashi) या त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. तत्पुर्वी उत्तर प्रदेश सरकारनं रंगरंगोटी कार्यक्रमाला सुरूवात केली आहे. या रंगरंगोटीमध्ये एका मशिदीला रंग देण्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

काशी विश्वनाथ मंदीराच्या परिसरातील विश्वनाथ काॅरिडाॅरचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर विश्वनाथ मंदिराकडं जाणाऱ्या रस्त्या शेजारच्या सर्व वास्तूंना गेरू रंगानं रंगवण्यात येणार आहे. या रस्त्यात एक मस्जिद आहे या मस्जिदीला सुद्धा गेरू रंग दिल्यानं सध्या वाद मुस्लीम समाज नाराज आहे. एका रात्रीत कोणालाही न सांगता रंग बदलल्यानं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं मस्जिद समितीचे मोहम्मद एजाज इस्लाही यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुस्लीम समाजाकडून तक्रार करण्यात आल्यानंतरही प्रशासनानं रंगकाम पुर्ण केलं आहे. तर काशी विश्वनाथ मंदिर परिसरासह संपुर्ण भागाचा रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्याचा कार्यक्रम चालू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. तरीही रंगाचा वाद योगी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंच्या भेटीला; समोर आलं ‘हे’ कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More