Maharashtra l सध्या देशाच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. अशातच देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे फिरत आहेत.यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींनी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वाद ओढावून घेतला आहे.
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेला जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवला आहे. आता याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय विरोधकांनी देखील प्रफुल पटेलांच्या या कृतीवरुन टीकेची झोड उठवली आहे.
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमी आणि सामान्य नागरिक अत्यंत दक्ष भूमिका बजावतात. जिरेटोप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावाचा भाग होता. त्यामुळे शिवप्रेमींच्या मनात जिरेटोप म्हणजे शिवराय, असे समीकरण पक्के झालेले आहे. त्यामुळेच प्रफुल पटेलांनी हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवल्याने ते टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Maharashtra l प्रफुल पटेलांवर शरद पवार गटाकडून हल्लाबोल :
अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला असल्याचे शिवप्रेमी बोलत आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून केलं जात आहे. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असा इशारा शरद पवार गटाकडून देण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच भडकले आहेत. वाराणसीमध्ये प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला यावर संजय राऊत यांनी थेट सवाल उपस्थित केले आहेत. नरेंद्र मोदी काय छत्रपती झाले आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आपण या सगळ्याचा बदला घ्यायचा, अशी आक्रमक भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
News Title – controversy Over Chhatrapati Shivaji Maharaj S Jiretop On Pm Modi S Head Zws
महत्त्वाच्या बातम्या
या दोन राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही चमकणार
कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा
‘या’ 2 लोकांसोबत मैत्री म्हणजे पैशांची बरबादी!
‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
भर कार्यक्रमात जया बच्चन असं काही बोलल्या, ऐश्वर्या रायला थेट रडूच कोसळलं, Video होतोय Viral