Navneet Rana | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे राज्यभरासह अमरावतीच्या बडनेरा विधानसभेतही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र या बॅनरवर लिहण्यात आलेला मजकूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बॅनरलावत ठाकरे गटाने अमरावतीच्या माजी खासदार नवनीव राणा (Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमरावतीमध्ये नवनीत राणांना (Navneet Rana) डिवचत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्याकडून लावण्यात आले आहे.
“स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली”
राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आलाय.
नवनीत राणांना पराभूत करणारे खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तो फोटो सुद्धा या बॅनरवत झळकत आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Navneet Rana | बॅनरवरून वाद
अमरावतीमध्ये बॅनरवरुन वाद उफाळून आला होता. यात अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला होता. या संपूर्ण प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला आणि या प्रकरणी काँग्रेसकडून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांना धक्का! आता ATM मधून पैसे काढण्यासाठीही मोजावे लागणार पैसे
“उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…”; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?
पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती
अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब