महाराष्ट्र मुंबई

“होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न”

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण उद्या 13 फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण केलं. त्यावरून सुरू झालेला वाद संपण्याआधीच अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

होळकर कुटुंबीयांनी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून होळकर कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

होळकर घराणे आणि छत्रपती घराण्याचे संबंध अनेक पिढ्यांपासूनचे आहेत. दोन्ही घराण्यांनी समाजहितासाठी काम करून लोकमान्यता मिळवली आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आपणास एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे. जी आपल्यापासून मुद्दामहून लपवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य उभारले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे व होळकर घराणे यांनी सोयरिकही केलं. बहुजन समाज एक होऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतू होता. पण आता होळकर घराण्याच्या समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोच करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या माध्यमातून होत आहे, असं होळकरांनी या पत्रात म्हटलंय.

होळकर घराण्याच्या परंपरेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात जेजुरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन चुकीचा संदेश देण्याचे आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे, याचा विचार आपणाकडून व्हायला हवा, असं होळकर कुटुंबीयांनी पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या