बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धर्मांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे, हे RSSचं कायम मत राहिलंय”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हिंदू धर्मावर प्रखरतेने आपलं मत मांडताना दिसत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तराखंडच्या देहराडून येथील एका कार्यक्रमात धर्मांतराच्या मुद्द्यावरून आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर आता आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी धर्मांतरावर आपलं मोठं वक्तव्य केलं आहे.

धर्मांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे, हे आरएसएसचं कायमचं मत राहिलं आहे. जर एखाद्याने स्व:इच्छेने निर्णय घेत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसं होताना दिसत नाही, असं दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटलं आहे. जर एखाद्याने धर्मांतर केलं तर दे दोन्ही लाभ कसं घेऊ शकतात?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आतापर्यंत10 पेक्षा जास्त राज्य सरकारांनी धर्मांतरविरोधी विधेयकं आणली होती. त्यातील सर्व सरकारे भाजपची नाहीत. हिमाचल प्रदेशामध्ये वीरभद्र सिंहांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे विधेयक फार पूर्वी मंजूर केलं होतं, असंही दत्तात्रेय होसबाळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहेच. मात्र, केवळ दिवाळीच्या वेळीच फटाक्यांवर बंदी घालणे हा प्रश्नावर उपाय नाही. इतर देशांमध्येही सणाच्या वेळी फटाके वाजवले जातात. दिवाळीच्या फटाक्यांवर जर बंदी घालण्यात आली तर त्याचा फटका अनेकांना बसेल. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, असंही दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

भाजपच्या मैदानात राहुल गांधींची किक! गोव्यातील जनतेला दिलं ‘हे’ वचन

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More