नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीनं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय.
निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटून घेतलं. यानंतर तुरुंग प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे.
विनय शर्माची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला.
दरम्यान, विनय शर्माच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं. विनयची मानसिक स्थिती उत्तम असून तो मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
इंदोरीकरांच्या समर्थनार्थ रविवारी ‘हा’ तालुका बंद!
मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेतील दोन नेत्यांचे राजीनामे???
महत्वाच्या बातम्या-
…नाही तर कायमचे बेरोजगार राहाल; योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल!
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावं चर्चेत!
“शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ”
Comments are closed.