Top News

कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

दिल | देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढतायत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच भारतात कोरोनवरील लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, सहा ते सात आठवड्यांमध्ये या प्रयत्नांना यश येईल, असा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना श्रीपाद नाईक बोलत होते. त्यावेळी श्रीपाद नाईक यांनी म्हणाले की, सध्या भारतात कोरोनाच्या चार-पाच लसींवर काम सुरु आहे. या लसींचे परीक्षण वेगवेगळ्या टप्प्यात आहे. आम्हाला याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आयुष मंत्रालाकडून ती तपासण्यात आली. त्यानुसार तीन महिन्यांत कोरोनावरील लस विकसित होईल, असा अंदाज आहे.

श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, “त्यापैकी एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी आहेत. आयुष मंत्रालयाकडून काढा तयार करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत.

काही दिवसांपूर्वी भारतीय वैदयक संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनवारील देशी लस विकसित होईल, असा अंदाज वर्तवाला होता. भारतातील दोन कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना लसींच्या मानवी परीक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. ७ जुलैनंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार- उद्धव ठाकरे

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या