जयपूर | कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि बाकी मेडिकल स्टाफला संसर्ग होण्याच्या आणि अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. आता 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
डॉ. कृष्णा मीणा असं या डॉक्टरचं नाव आहे. त्या अंता येथील आयुष डॉक्टर होत्या. त्यांचे पती डॉ. कमल मीणा अंटा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत. व्हेंटिलेटरवर 15 दिवस राहिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. कृष्णा यांचे भाऊ डॉ. भोजराज मीणा यांनी कृष्णाला याआधी तीन वर्षांची मुलगी असल्याचे सांगितलं. तसेच 19 एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म झाल्याची माहिती भोजराज यांनी दिली.
रुग्णालयातून घरी परत येताना त्यांना ताप आला. दुसर्या दिवशी तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळलं. त्यांचा एच आर सीटी स्कोअर 17 होता. अचानकपणे त्यांची तब्येत बिघडू लागली. शनिवारी सकाळी डॉ. कृष्णा यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला”
“कोरोनाची लढाई कठीण आणि भयानक होणार आहे, सज्ज रहा”
‘डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय’; डॉक्टर ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ
…अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार; सलमान खानची कायदेशीर कारवाईची धमकी
गोड बोलून त्याला जवळ बोलावलं अन् नंतर महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण आलं समोर
Comments are closed.