बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारीने (Corona) मुंबईकरांच्या (Mumbaikar) नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे. सध्या वाढत चाललेल्या ओमिक्राॅनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत आज दिवसभरात 186 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 210 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 4 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,62,616 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 1886 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,42,602 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार”

भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले, सभागृहात जोरदार घोषणाबाजी अन् तू तू मै मै

‘…मग मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का?’; अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

Mayank Agarwal ची बॅट तळपली! शतक ठोकत उडवला किवीं गोलंदाजांचा धुव्वा

शरद पवार यांच्यासोबत क्रिकेट सामना पाहण्याची संधी, रुपाली चाकणकर म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More