बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

नवी दिल्ली | कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर जगाचं टेंशनच वाढवलं आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहिम राबवण्यात येत असून लसीकरण हे या लढ्यातील एकमेव शस्त्र आहे. अशातच आता कोरोनाच्या संसर्गामुळे तरुणांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर फुफ्फुसांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याची भीती अनेकांना वाटते मात्र आता संशोधनातून याविषयी दिलासायक माहिती समोर येत आहे.

नुकतंच झालेल्या नवीन संशोधनानुसार, कोरोनाच्या संक्रमणानंतर व्यक्तींमध्ये फुफ्फुसांचं नुकसान होण्याचा धोका कमी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे  कोरोनाच्या संसर्गामुळे तरुणांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होण्याचं कारण नाही.

दरम्यान, व्हर्च्युअल रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या निबंधात कोरोनाच्या संक्रमणामुळे तरुणांच्या फुफ्फुसांच्या कार्यावर काही परिणाम होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांचे वाढीव पदांच्या मंजुरीसाठी बेमुदत उपोषण

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More