पुणे महाराष्ट्र

पिंपरीत कोरोना रुग्णात सारीची लक्षणं आढळल्याने खळबळ!

Loading...

पुणे | पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचं संकट ओढावलं आहे. एका महिलेमध्ये ‘सिव्हीअरली अ‌ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस’ अर्थात सारीची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यात कोरोना विषाणूचं आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचं समोर आलं आहे.

सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आता एकूण 22 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गेल्या बारा तासाच्या आतच 2 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना नियंत्रणात राहण्याचं पहिलं श्रेय मोदींनाच”

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या