बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून क्रिडाक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. सध्याही तिच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात क्रिकेटला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. लोकप्रिय आयपीएल कोरोनाच्या शिरकावामुळे रद्द करावी लागली होती. तर आता खेळल्या जाणाऱ्या भारत श्रीलंका मालिकेवर सुद्धा कोरोनाचं सावट आलं आहे.

श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅट फ्लावर आणि संघ विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर परफॉर्मन्स विश्लेषक शिरांथा निरोशन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव आणखी वाढू नये म्हणून वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर सर्वांच्या कोरोना चाचण्या देखील करण्यात येत आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना 13 जुलैला खेळवला जाणार होता. 13, 16 आणि 18 जुलै रोजी वन डे सीरिज होणार होती. परंतू आता पहिली वनडे 17 जुलैला खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सीरिज होणार होती. तर टी 20 सीरिज आता 24 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर लवकरच बीसीसीआय याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे सर्व सामने कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन , संजू सॅमनस , युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या- अजित पवार

“मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये”

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More