बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी मंत्र्यांच्या पोरांचं ‘एक पाऊल पुढे!’

इंदापूर | कोरोनाने महाराष्ट्रात थैैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी रूग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. तर काही ठिकाणी रूग्णांना आरोग्य सुविधा मिळताना दिसत नाहीत. सरकार आणि मंत्र्याकडून कोरोना स्थिती पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. यातच आता अंकिता पाटील आणि श्रीराज भरणे या दोघांनी नव्याने राजकारणात येणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सुकन्या अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांना परिसरात अस्वच्छता दिसली. कोरोना प्रसाराला ही अस्वच्छता कारणीभूत ठरू शकते, असा विचार करून अंकिता पाटील यांनी तिथल्या कुणा कार्यकर्त्याला किंवा शासकीय कर्मचाऱ्याला सूचना करत न बसता स्वतः हातात झाडू घेतला आणि रुग्णालय परिसर स्वच्छ केला. त्यांच हे कृत्य पाहून कार्यकर्त्यांनी देखील झाडू हातात घेतले.

तर दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी इंदापुरात व्ही. पी. कॉलेज येथे 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरु आहे. हे सेंटर लवकर चालू करण्यात यावं या उद्देशाने श्रीराज भरणे यांनी स्वतः कार्यकर्त्यांसोबत गाद्या उचलत त्या कोवीड केअर सेंटरमध्ये नेऊन तेथील बेडवर ठेवल्या. तर कोविड सेंटरमधील अनेक बेडवर त्यांनी गाद्या अंथरल्या. त्यांचं हे कोविड केअर लवकरच कोरोना रूग्णांसाठी चालू होणार आहे.

दरम्यान, अंकिता पाटील व श्रीराज भरणे या दोघांनी नव्याने राजकारणात येणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. इतर गंभीर परिस्थितीत ज्याप्रमाणे नेते जनतेच्या पाठिशी उभी राहतात. त्याप्रमाणे कोरोना काळात देखील त्यांंनी जनतेसाठी नेत्यांनी मैदानात उतरायला हवं.

थोडक्यात बातम्या-

‘फी भरली नाही म्हणून परिक्षेला बसू न दिल्यास…’; शिक्षण विभागाने केलं हे महत्वाचं आवाहन

भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो, परिस्थिती लवकर सुधारेल- शोएब अख्तर

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; घरासह मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

महामारीच्या काळात ‘या’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती; जाणून घ्या अधिक माहिती

‘राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न’; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More