नवी दिल्ली | हिवाळ्याच्या काळात कोरोना वाढू शकतो, असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. तसेच दसरा, दिवाळी या सणांमध्ये सर्वांनी काळजी घ्या असा सल्लाही हर्षवर्धन यांनी दिला आहे.
कोरोना विषाणू हा श्वसनयंत्रणेवर हल्ला करणारा विषाणू आहे. असे विषाणू थंड वातावरणात अधिक वाढतात, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. त्यामुळे या लसींचा आपात्कालीन वापर सुरू करण्याबद्दल केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही, असंही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय.
महत्वाच्या बातम्या-
“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”
“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”
तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”