बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त झालेल्या माय-लेकीचा पाठलाग करत आईवर गँगरेप, मुलगी वाचली

गुवाहाटी | सध्या कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. वाढत्या कोरोनामुळे रुग्णवाहिकेंची देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशातच आसाम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आसाममधील चराईदेव जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या माय-लेकी नुकत्याच कोरोना निगेटिव्ह होऊन घरी येत असताना त्यांच्यासोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.

संबंधित आई बोरहाट नागामती भागात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या श्रमीक कुटुंबातील आहे. काही दिवसांपूर्वीच पीडित महिला, तिचा पती आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला तिघंही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे तिघांनाही सपेखाती मॉडल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

27 मे रोजी महिलेच्या पतीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तर महिलेचा आणि तिच्या मुलीचा कोरोना अहवाल 29 मे रोजी निगेटिव्ह आला. यावेळी संबंधित महिलेने रुग्णालयाकडून वाहनाची मागणी केली असता रुग्णालयाने ती अमान्य केली. या कारणामुळे महिलेला आणि तिच्या मुलीला घरी पायी जावं लागलं.

दरम्यान, महिलेचं घर रुग्णालयापासून 25 किमी दूर होतं. पायी जाताना काही लोक महिला आणि तिच्या मुलीचा पाठलाग करत होते. तसेच काही अंतरावर पोहोचताच महिलेवर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. तर यावेळी मुलगी कशीबशी आरोपींच्या तावडीतून पळून गेली. या सर्व प्रकाराला महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयाला जबाबदार ठरवून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

अकोल्यात शासकीय निवासस्थानी घडला धक्कादायक प्रकार; सरकारी कर्मचाऱ्याची हत्या करून….

काय सांगता! चक्क चिमणी करतीये स्केटिंग, पाहा व्हिडीओ

91 वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर यशस्वी मात; रूग्णालयातून डिस्चार्ज

“मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण; आरक्षणाबाबत भाजपचा दुतोंडी चेहरा”

धक्कादायक! मुलाचा बाप कोण हे शोधण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह काढला बाहेर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More