बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

नवी दिल्ली | भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. भारतात लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असलं तरीही बाधितांच्या संख्येत दररोज जवळपास तीन लाखांहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतातील अनेक राज्यांमध्ये अक्षरश: मृत्यूचं थैमान घातलं आहे.

दरम्यान, भारतामध्ये दररोज दोन हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत आहे. पण मृत्यूचा आकड्याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने एक धक्कादायक वृत्त प्रकाशित केलं आहे. भारतात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लपवली जात असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

अनेक राज्याच्या स्मशानभूमीमध्ये दिवस-रात्र अंत्यसंस्कार होत आहेत. तिथून येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आणि प्रशासन जाहीर करत असलेला आकडा याच्यामध्ये मोठी तफावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतातील राजकीय नेते आणि प्रशासन हे एकत्रितरीत्या मिळून कोरोना मृतांचा आकडा लपवत असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.

दरम्यान, मिशिगन विद्यापीठात साथ रोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भ्रमर मुखर्जी यांनी भारतात मृतांचा आकडा हा दोन ते पाचपट अधिक असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. आज पर्यंत देशात कोरोनामुळे तब्बल 1 लाख 95 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. पण न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार ही संख्या जवळपास 5 लाखांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचे चौकशीचे आदेश

…म्हणून पतीने आपल्या पत्नीची प्रियकरासोबतच बांधली लगीनगाठ!

“लसींच्या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का आहेत?”

अबब! चक्क फुलपाखराचं ऑपरेशन; एकदा व्हिडीओ पाहाच  

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More