बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली.  24 तासात तब्बल 3 लाख 60 हजार 960 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 293 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 2 लाख 61 हजार 162 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 29 लाख 78 हजार 709 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनच्या दिशेने बैठकांचं सत्र सुरू आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. काल दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 3 हजार 871 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची गरज नाही’; ‘या’ देशाची मोठी घोषणा

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

…म्हणून त्यावेळी थांबवला होता दिल्ली आणि बंगळूरूचा आयपीएल सामना

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More