बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानं खासदाराचं कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांच्या अकराव्या-बाराव्याला दोन्ही मुलांचाही मृत्यू

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. तसेच एका एका कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोनानेे ग्रासल्याचं पहायला मिळत आहे. काही उपचार घेत आहेत, तर काहींनी जगाचा निरोप घेतला आहे. यात अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.

कोरोनामुळे निधन झालेल्या खासदारानंतर त्यांच्या दोन मुलांचाही कोरोनाने जीव घेतला आहे. रघुनाथ मोहपात्रा यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालं होतं. आता त्यांच्या दोन्ही मुलांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मोहपात्रा यांच्या दोन मुलांनाही कोरोना झाला होता. त्यांचा दुसरा मुलगा प्रशांत मोहपात्राचं कालच कोरोनामुळे निधन झालं आहे. तो ओडिशा रणजी ट्रॉफी क्रिकेट टीममचा माजी कॅप्टन होता.

रघुनाथ मोहपात्रा यांचा सर्वात मोठा मुलगा जशोपंत मोहपात्रा यांचासुद्धा कोरोनामुळे जीव गेला आहे. एम्स भुवनेश्वरमधून त्यांना एसयूएममध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. ते 52 वर्षांचे होते.

थोडक्यात बातम्या- 

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट कोसळलं; एका पायलटचा मृत्यु, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More