बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे ‘या’ तालुक्यातील दोन कुटुंबे उद्ध्वस्त, आठ दिवसांत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एका एका कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोनाने ग्रासलेले आहे. काही उपचार घेत आहेत, तर काहींनी जगाचा निरोप घेतला आहे. शहरातील जाधव कुटुंबातील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. यातील तिघांचा आठवडाभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, जामखेड तालुक्यातील साकत येथील मुरुमकर कुटुंबातील वडील व मुलगा यांचा तीन दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात सध्या कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. जामखेडच्या जाधव कुटुंबातील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 3 व्यक्तींचे एका आठवड्यात मृत्यू झाले. उर्वरित सदस्यांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. लक्ष्मण जाधव, लक्ष्मी जाधव आणि मुलगा श्रीकांत जाधव यांचा एका आठवडय़ात कोरोनामुळे मृत्यू झाला. सर्वांत आधी लक्ष्मण जाधव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मुलगा श्रीकांतचीही झुंज अयशस्वी ठरली. या धक्क्यातून लक्ष्मण यांच्या पत्नी लक्ष्मी सावरल्या नाहीत आणि त्यांचाही मृत्यू झाला.

तालुक्यातील साकत येथील मुरुमकर कुटुंबातील सेवानिवृत्त शिक्षक उत्तम मुरुमकर यांचे कोरोनामुळे सोमवारी निधन झाले, तर नगर येथे कोरोनावर उपचार घेत असलेला मुलगा डॉ. प्रशांत मुरुमकर यांचा बुधवारी कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. तीन दिवसांत घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, जाधव कुटुंबातील तीन व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाले असतानाच, चोरट्यांनी जाधव यांच्या घरावर डल्ला मारत त्यांची आयुष्यभराची जमापुंजी लुटून नेली आहे. सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन लुटून नेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक, पण मृतांचा आकडा वाढला

बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

महाराष्ट्रातील म्यूकरमायकोसिस 100 दिवसात नियंत्रणात येणार?; तज्ज्ञ म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More