महाराष्ट्र मुंबई

हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

Loading...

मुंबई | कोरोनाने आपल्या देशासह सर्व जगभरात हैदोस मांडला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. त्यासोबत मोठमोठे उद्योगपती, अभिनेते मदत म्हणून देणगी देत आहेत. अशातच राज्यातील देवस्थानांही मदत करण्याची विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी पुढं आलेल्या लालबागचा राजा, सिद्धीविनायक, शिर्डी या देवस्थानांचे आभार. देणगी रुपात जमा झालेला दानपेटीतील पैसा समाजासाठी देण्याची हिच वेळ आहे. इतर देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी, अशी माझी विनंती आहे व ते करतील असा विश्वास असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...

रस्त्यावर फिरण्यासाठी पोलिसांनी कारवाई करु नये म्हणून काही लोकांकडून डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिट्ठीचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याचं समजतंय. पण हे लोक पोलिसांना नाही तर स्वतःला फसवत आहेत, असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांनी अजूनही भानावर यावं आणि कोरोनाला घरी घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर येऊ नये, असं आवाहनही रोहित पवारांनी केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या