बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियतीचा क्रुर डाव! माय-लेकीचा कोरोनाने केला घात, दोघींचा एकाचवेळी दशक्रिया विधी 

अहमदनगर | कोरोनाचा विळखा दिवसंदिवस वाढतच जात आहे. कोरोनाने कित्येक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. अशातच हृदय पिळवटून टाकणार एक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिंदे कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईचा आणि मुलीचा एकाच दिवशी दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे.

अकोला जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केलेल्या सुकृताचा आणि तिची आई सुनिता शिंदे कोरोनाने मृत्यू झाला आहे. सुकृताच्या आईचा आठ दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीनं देखील या जगाचा निरोप घेतला आहे. माय-लेकीचे पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुकृताचं अलिकडेच लग्न ठरलं होतं.  मध्यंतरी साखरपुडा झाला होता त्यामुळे तिचा होणारा पती आणि त्यांचे कुटुंबदेखील तिची काळजी घेत होते. मात्र कोरोनाने सुकृताचा बळी घेतला. 4 मे 2021 रोजी तिचा विवाह होणार होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला होता.

दरम्यान, अकोले तालुक्यामध्ये पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करू लागली होती. सुकृताने एम.ए. मराठीचे देखील शिक्षण घेतलं होतं. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मात्र कोरानाने माय-लेकीचा घात केला.

थोडक्यात बातम्या- 

“एकटा संभाजी काय करणार?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”

बाबो! उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले तब्बल ‘इतके’ पैसे

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट

मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट्सवर ‘हे’ औषध प्रभावी, संशोधकांचा दावा

खासदारकी मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो- संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More