मुंबई | सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 31 वर येऊन पोहोचली आहे. कोरोनाची वाढती दहशत पाहता मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आयआयटीने 29 मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग, तसेच प्रयोगशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता मुंबई आयआयटीकडूनही सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे 29 मार्चपर्यंत वर्ग, तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रवासासाठी काही अडचण येत असेल. मुंबई आयआयटीत शिकत असलेल्या बाहेर देशातील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आली आहे की ते मुंबई आयआयटी हॉस्टेलमध्ये सुट्टी दरम्यान राहू शकतील.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचं भवितव्य
राज्यात ‘कोरोना’चं थैमान; पाळीव प्राण्यांनाही ‘कोरोना’चा फटका
महत्वाच्या बातम्या-
निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”
“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”
Comments are closed.