बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरली असं वाटत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. त्यात दिवसेंदिवस संशोधनातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटबाबत वेगवेगळ्या संशोधनातून वेगवेगळे दावे केले जात आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रूग्णांमध्ये स्पर्म क्वालिटी खराब झाल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 35 पुरूषांवर याबाबत संशोधन करण्यात आलं होतं.

कोरोनातून बरं झाल्यावर एका महिन्यानंतर त्यांच्या स्पर्मची गतिशीलता 60 टक्क्यांनी तर स्पर्मची संख्या (Sperm Count) 37 टक्क्यांनी कमी झाली. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा संसर्ग आणि स्पर्मच्या वैशिष्यांमध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचं ‘फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी’मध्ये प्रकाशित झालं आहे.

दरम्यान, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंट पेक्षा कमी घातक असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. असं असलं तरी या व्हेरिएंटचे अंतर्गत परिणाम जास्त असल्याचं ब्रिटनमधील संशोधकांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा; ‘या’ लाभार्थींच्या खात्यात जमा करणार 20 कोटी रूपये

‘शिवाजी महाराज ओबीसी होते’; महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

MHADA पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ भाजप नेत्याला अटक

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More