पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतला आहे.
गर्दी टाळण्यासाठी मॉल, दुकाने, मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच नागरिकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासन करत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकित हॉटलांचा अपवाद) या ठिकाणी मद्य विक्री बंद ठेवली जाणार आहे. 18 मार्च ते 31 मार्चपर्यंत पूर्ण दिवस ही मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अधिनियमन 1949 आणि त्याअंर्तगत कलम आणि नियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स
“50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्यास कंपनीवर कारवाई करणार”
संसार करत करत अभ्यास… पीएसआयच्या परीक्षेत ‘तिने’ मिळवलं घवघवीत यश!
Comments are closed.