बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना इफेक्ट… HIV बाधितांच्या संख्येबाबत चांगली बातमी आली समोर

मुंबई | कोरोना महामारीमुळे मुंबईतील एचआयव्ही रुग्णांच्या संख्येवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे एचआयव्ही बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षभरात एचआयव्ही बाधितांच्या संख्येत अर्ध्याहून घट झाली असल्यानं एचआयव्ही बाधितांच्या संख्येबाबत ही एक चांगली बातमी समोर येत आहेत.

कोरोना काळात केल्या गेलेल्या एचआयव्ही चाचण्या आणि नव्या रुग्णांना संसर्ग होण्याच्या संख्येत घट पाहायला मिळाली. नव्यानं निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून ही संख्या 2,069 पर्यंत घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एचआयव्ही बाधित आढळून येण्याचं प्रमाण कमी झालं आहे.

एचआयव्ही बाधित व्यक्तीसाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत अधिक चिंता आणि तणावयुक्त गोष्टींचा अधिक परिणाम होतो. एचआयव्हीच्या निदानानंतर मानसिक धक्का जाणवू शकतो मात्र त्यातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे.

दरम्यान, 2019-2020 काळात एचआयव्ही चाचण्यांच्या संख्येत वाढ होत चार लाख 73 हजार चाचण्या केल्या गेल्या. मात्र त्या तुलनेत नव्यानं निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाली असून 4,473 रुग्ण आढळले. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात चाचण्यांची संख्या सुमारे दोन लाख 63 हजारापर्यंत कमी झाली.

थोडक्यात बातम्या – 

भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?

टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…

“सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल”

राज्यात डेल्टा प्लसचा धुमाकूळ सुरु; आणखी इतक्या रुग्णांना संसर्ग

“राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे वेगळे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More