बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लहान मुलं कोरोनामुक्त झाले तरी…’; संशोधनातून चिंतेची बाब समोर

नवी दिल्ली | कोरोनानं गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवला आहे. कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेची चिंता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या लोटेत लहान मुलांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी जास्त धोका नसल्याचा पाहायला मिळालं. मात्र येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याची शक्यता अनेक वैद्यकीय सल्लागारांनी दिली होती. अशातच आता यामध्ये आणखी चिंतेची भर पडली आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या एका नवीन संशोधनात लहान मुलांवर कोरोनाचा प्रभाव हा दीर्घकालीन राहू शकतो, असं समोर आलं आहे. त्यामुळे आता पालकांना आपल्या मुलांची चिंता वाटू लागली आहे. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी एका मोठ्या संशोधनात असा दावा केला आहे की, ज्या लहान मुलांना कोरोना झाला होता, ते त्यातून बरे झाले तरीही त्यांच्यात अजूनही कोरोनाची लक्षणं आहेत.

दरम्यान, या नव्या संशोधनातून चिंतेची लाट उसळली आहे. कोरोनानं जगभरातील लोकांचं टेंशन वाढवलं आहे. त्यात नवनवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर येत असते. त्यामुळे आणखी चिंतेत वाढ होताना दिसते.

थोडक्यात बातम्या –  

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

“गरीब देश कोरोनाने चिरडलेत, लसीकरणासाठी त्यांना मदत करायलाच हवी”

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More