नागपूर| देशभरात कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर पोहोचली आहे. कोरोनाने आता विदर्भात शिरकाव केला असून यवतमाळमध्ये 2 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील 9 जण दुबईला गेले होते. यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हे दोघेही यवतमाळमधील आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि आता यवतमाळमध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आज मुंबई आणि नागपूरमध्ये 1 कोरोना रूग्ण सापडला असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार चालू आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पहायला मिळत आहे.
देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 84 झाली असल्याचं वृत्त केंद्रिय आरोग्य विभागाने दिलं आहे. तसंच कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार असल्याचं जागतिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
कोकणचा हापूसही सापडला कोरोनाच्या कचाट्यात; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
पुणेकरांना दिलासा; 10 कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर
हनिमून झाल्यावर कळालं नवऱ्याला कोरोनाची लागण; पत्नी पळाली!
Comments are closed.