बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महासाथीने हाहाकार माजवला आहे. जगभरातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. कोरोना विषाणूमध्ये अनेक म्युटेशन्स होत असल्याने ठोस उपाय अद्यापही उपलब्ध झाला नाही. कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन्स झाल्याने डेल्टा व्हेरिएंट आणि  ओमिक्रॉन व्हेरिएंट तयार झाला होता. त्यातच आता ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या मिश्र विषाणूने चिंता वाढवली आहे.

ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचा जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून रिकॉम्बिनंट व्हायरस आढळला आहे.  डॉ. राकेश मिश्रा यांनी यासंदर्भात अनेकांना मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग होण्याचं कारण म्हणजे ओमिक्रॉन असल्याचं म्हटलं आहे.

ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचा व्हायरस एकत्र होणे ही एक समस्या नाही, असं म्हटलं आहे. तसेच कोरोना व्हायरसमध्ये सतत बदल होणे ही एक मोठी समस्या असल्याचं राकेश मिश्रा यांनी म्हटलं आहे. देेशात भविष्यात अनेक कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येऊ शकतात. कोरोनाचे नवे व्हेरिएंट येतात की, नाही यावर कोरोनाचा शेवट अवलंबून आहे, असं राकेश मिश्रा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. कोरोना महामारी संपली आहे, आता काही होऊ शकत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असं मत राकेश मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात आली आहे. त्यातच कोरोना संपला आहे, अशा संभ्रमात कोणी राहू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”

‘बॉम्ब कुठं आहे?’ विचारत धनंजय मुंडेंनी थोपटले दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर

मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

…अन् भररस्त्यात मुलींची तुंबळ हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More