बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त होणारी गाव होणारं लखपती, सरकारने केली ‘या’ खास स्पर्धेची घोषणा

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कुठे तरी आळा बसावा आणि या संकटातून सगळे बाहेर पडावेत या हेतूनं सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं आणि गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झालं तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल.

याच पार्श्वभूमीवर राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये  आणि 15  लाख याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणं राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.  यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 25  लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार. स्पर्धेत सहभागी गावांचे वेगवेगळ्या 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे.  या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावं, असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

लग्नात नवरदेवानं नवरीच्या पायावर डोकं टेकवलं, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची कहानी!

“खासगी रूग्णालयांप्रमाणे आम्हीही केंद्राला पैसे देतो, आम्हालाही लसी द्याव्यात”

काय सांगता! ‘या’ ठिकाणी मिळतंय चक्क 1 रुपया 46 पैसे प्रती लीटर पेट्रोल

महत्त्वाची बातमी! पुण्यात सुरु झालेली ही दुकानं राहणार बंद, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

काय सांगता! चक्क पोपटाने गायलं गिटारच्या धूनवर गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More