बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 299 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 501 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहिशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 5 हजार 397 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 99 हजार 319 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत  आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

घरात-दुकानात पाणी शिरलेल्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत; ठाकरे सरकारचा निर्णय

“जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे कर्तव्य आहे, ते पार पडलं पाहिजे”

‘झारखंड सरकार पाडण्यात केंद्रासह महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ नेत्याचा हात’; राष्ट्रवादीेचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More