नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगानं संपूर्ण जगभरात थैमान घातलेलं पहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आता हळूहळू कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला असून सगळं पून्हा पुर्वपदावर येत असलेलं पहायला मिळत आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी अद्याप तो संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे निर्बंधांचे पालन करण्यास सरकारकडून सांगितलं जात आहे. कोरोनाच्या या लढ्यात लसीकरणानं मोठी साथ दिली आहे. लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना आटोक्यात आला असल्याचं पहायला मिळालं.
कोरोनाला नष्ट करण्यासाठी असूनही लसीकरणावर संशोधन सुरु आहे. अशातच आता शास्त्रज्ञांना वनस्पतीपासून लशीची निर्मिती करण्यात यश आलं असून, वनस्पतींवर आधारित ही पहिली लस ठरली आहे. या लशीचं नाव कोव्हिफेन्झ असं आहे.
दरम्यान, कॅनडा सरकारने या लशीला मान्यता दिली आहे. कॅनडात तयार झालेली ही पहिली लस आहे. मित्सुबिशी केमिकल, बायोफार्मा कंपनी, मेडिकागो आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कंपन्यांनी ही लस विकसित केली आहे.
थोडक्यात बातम्या –
सर्वात मोठी बातमी; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण
“मी पुन्हा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”
‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…
“…पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना काय कळणार”
Comments are closed.