बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. या महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच डॉक्टरांनी मोलाचं योगदान दिलं. परंतु, बऱ्याच नागरिकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला.

कोरोना रुग्णांसाठी देवदूत म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना देखील उपचार करतेवेळी कोरोनाची लागण झाली. तसेच देशभरात गेल्या दीड वर्षापासून तब्बल 1 हजार 467 डॉक्टरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत 748 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट सक्रिय आहे. या लाटेमध्ये अवघ्या काही महिन्यातच तब्बल 719 निवासी तसेच इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केलं आहे. ज्यामध्ये बिहार व दिल्लीतील मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा समावेश आहे.

बिहारमध्ये दुसऱ्या लाटेत 111 डॉक्टरांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला तर दिल्लीत 109 डॉक्टरांना प्राण गमवावा लागला. मृत डॉक्टरांचे वय साधारण 30 ते 55 या वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये निवासी डॉक्टरांसह इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचाही समावेश आहे. देशात आता दुसरी लाट ओसरत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेची विनंती विद्यापीठाने फेटाळली, तब्बल 9 हजार विद्यार्थी होणार नापास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More