दिसपूर | देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यातच आता आसामचे आरोग्यमंत्री आणि भाजप नेते असलेले हेमंत बिस्वा सरमा यांनी अजब वक्तव्य केलं आहे.
हेमंत बिस्वा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या कारणामुळे निवडणूक आयोगाने त्यांना ४८ तासांपर्यंत प्रचार करता येणार नाही, असे निर्देश दिले होते. त्यानंतर बिस्वा यांनी उच्च न्यायालयात याला आव्हान दिल्यामुळे हा निर्देश २४ तासांचा करण्यात आला. मात्र प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कोरोना गेला असल्याचं बिस्वा यांनी म्हटलं आहे.
आसाममधील लोकांनी मास्क घालण्याची गरज नसून मास्क घातल्यावर लोकांमध्ये भीती वाढते, असं बिस्वा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच जेव्हा मास्क घालण्याची गरज असेल तेव्हा शासनाकडून सूचना देण्यात येईल, असं देखील बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मास्क घालून फिरल्यावर ब्यूटी पार्लर कसे चालतील?, असा सवाल बिस्वा यांनी केला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचं देखील बिस्वा यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेवटचं खेळताना पाहा; कारण ‘हे’ तीन दिग्गज पुन्हा IPL खेळण्याची शक्यता नाही!
“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”
महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!
राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.