बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा विरोधीपक्ष भाजपवर शरसंधान साधलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी ठाकरे सरकारमुळेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकार जागरूक राहिल्यामुळेच आता कोरोना आटोक्यात आला आणि दिवाळीपुर्वी लाॅकडाऊनमधून नागरिकांना सवलत देता आली.

भाजपच्या आंदोलनामुळे नाही तर टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर मंदीराची दारं उघडण्यात आली, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या, अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सध्या या ना त्या कारणाने सतत भाजप विरुद्ध शिवसेना आमने-सामने आल्याचं अनेकवेळा पाहायला मिळत आहे. त्यातच राऊतांनी पुन्हा भाजपवर हल्ला केला आहे.

‘थाळ्या वाजवून कोरोना पळवण्याचा दिव्य संदेश पंतप्रधानांनी दिला होता, ते केल्याने उपयोग मात्र काही झाला नाही, परंतू, कोरोनामुळे अनेक चिता पेटल्या तसेच गंगेत अनेक प्रेतांना जलसमाधी मिळाली’, असं म्हणत त्यांनी आजच्या अग्रलेखातून थेट पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं.

‘थाळ्या आणि घंटापेक्षा विज्ञान आणि वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर जनतेेचे प्राण वाचवु शकते’, असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे सरकारने केलेल्या उपाययोजना आणि जागरूकतेचा उल्लेख करत त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचं आजच्या अग्रलेखात नमुद केलं आहे.

थोडक्यात बातम्या

सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More