बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं भारतात पाऊल पडताच कोरोना संपणार”

नवी दिल्ली | आपण भारतात पाऊल ठेवताच भारतातील कोरोना संपणार आहे, असा दावा स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने केला आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे.

व्हिडीओमध्ये नित्यानंदचा एक शिष्य त्याला विचारतो की भारतातून कोरोनाची महामारी कधी संपेल. त्यावर उत्तर देताना नित्यानंद म्हणतो की, आता आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील कोरोना संपेल.

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 19 एप्रिल रोजी कथित स्वामी नित्यानंदने स्वत:च्या मालकीचा देश जाहीर केलेल्या ‘कैलासा’वर भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारत, ब्राझिल, मलेशिया आणि युरोपियन युनियनमधील प्रवाशांनी कैलासावर येऊ नये असं त्याने सांगितलं होतं.

दरम्यान, भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेला नित्यानंद हा 2019 साली देशातून फरार होऊन इक्वेडोरच्या एका बेटावर जाऊन लपला आहे. त्या बेटावर त्याने आपलं बस्तान मांडलं असून कैलासा या नव्या देशाला मान्यता मिळावी म्हणून संयुक्त राष्ट्राकडे अनेक वेळा मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

Beta आणि Delta व्हेरिएंटवर ‘ही’ लस अधिक प्रभावी; अभ्यासकांनी केला उलगडा

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More