बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

मुंबई | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहिम राबवली जात आहे. यातच आटोक्यात येत असलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. अशातच आता कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागल्याचं समोर येत आहे.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागले आहे. कोरोनामुळे ज्यांची स्थिती फार क्रिटिकल झाली होती अशा लोकांना ही समस्या अधिक जाणवत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोनाची लक्षणं हळूहळू दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे शरिरावर त्याचा गंभीर परिणाम हळुवार दिसून येतो. ज्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात, जे लोक कोरोनामध्ये गंभीर आजारी होते त्यांना कमी वजनाचा आणि कुपोषणाचा जास्त धोका असतो. सुमारे 30 टक्के रुग्णांमध्ये शरीराचे वजन 5 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. कोरोनामुळे गंभीरपणे आजारी पडलेल्या सुमारे अर्ध्या रुग्णांना कुपोषणाचा धोका आहे, असं नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

दरम्यान, महामारीच्या सामाजिक-आर्थिक परिणामांमुळे जागतिक स्तरावर कुपोषणात वाढ होऊ शकते. सर्व प्रकारचे कुपोषण अनारोग्य व मृत्यूसाठी प्रमुख कारण बनले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील दबाव वाढत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

हर्षल पटेलची हॅट्रिक! हार्दिक, पोलार्ड आणि राहुलला दाखवला घरचा रस्ता

बंगळुरूचा राॅयल विजय! मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी दारूण पराभव

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More