पुणे महाराष्ट्र

पुण्यात महापौरांपाठोपाठ उपमहापौर आणि सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुणे | पुण्यात महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर सरस्वती शेडगे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता उपमहापौर यांच्यासह सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत.

मला ताप आला होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी केली. त्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आता माझी तब्येत ठिक आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितलम होतं.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या