देश

पत्ते खेळणं पडलं महागात; 40 जणांना झाली कोरोनाची बाधा!

हैद्राबाद | सरकारकडून नागरिकांना अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण लोकं या सूचनांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे.

आंध्र प्रदेशमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता पत्ते खेळत असलेल्या एकूण 40 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा विभागात लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी काही लोक मिळून पत्ते खेळत होते. यामुळे 40 लोकांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी दिली.

दरम्यान, दोन्ही घटना समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असा संदेश दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे- रितेश देशमुख

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

राजा कायम पण ताण वाढेल; पाहा आणखी काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

फेसबुक-जिओ भागिदारीचा नवा अध्याय; व्हॉट्सअपच्या मदतीनं ‘जिओमार्ट’ सुरु

या आहेत मुंबईच्या महापौर!; पण त्या अशा वेषात रुग्णालयात का पोहोचल्या???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या