बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona : कोरोना होऊ नये म्हणून घेतले 4 डोस, तरीही शेवटी…

नवी दिल्ली | कोरोनावरील लस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना (Corona) होऊचं शकत नाही अशी तुमचीही समजूत झाली असेल आणि तुम्हीही कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंदौर येथील एका महिलेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 4 डोस घेतल्यानंतरही तिला कोरोनाची बाधा झाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदौर येथे हा सर्व प्रकार घडला आहे. या महिलेने कोरोना प्रतिबंधात्मक 2 वेगवेगळ्या लसींचे एकून 4 डोस घेतले होते. इंदौर येथील अहिल्या देवी होळकर आतंरारष्ट्रीय विमानतळावर महिलेची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीत महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान लसीचे 4 डोस घेतले होते. तिने सिनोफार्मचे 2 आणि फायझरचे 2 असे एकूण कोरोना प्रतिबंधक लसीचे 4 डोस घेतले होते. शिवाय या महिलेच्या शरीरात कोरोनाचं कोणतही लक्षण आढळून आले नव्हते. तरीही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, सर्वात पहिल्यांदा लस घेतलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिल्पाने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली आहे. लसीकरण पूर्ण करूनही अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

Corona: सर्वात पहिल्यांदा लस घेतलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईनंतर आता ‘या’ ठिकाणीही 31st च्या पार्ट्यांवर बंदी, वाचा काय आहेत नियम

Corona: लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, आता हातातच…

महात्मा गांधींविरोधात गरळ ओकणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

“राज्य सरकारमधील नेत्यांना घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट पुरस्कार दिले पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More